प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लक्ष २१ हजार ६०८ लाभार्थ्यांनी ही ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. अजुनही ६७ हजार ७३६ लाभार्थी शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे.ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)/ आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधारकार्ड व आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचा आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांच्याकडे आधारकार्ड आणि उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतः लाभार्थ्याला कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवरूनही आधार ई-केवायसी करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.शेतकऱ्याला स्वतः ई-केवायसी करता येईल, यासाठी सुरुवातीला google crome मध्ये जावे.fw.pmkisan.gov.in हे संकेतस्थळ टाकावे. उजव्या हाताला थोडे खालच्या बाजूस Farmer Corner च्या खाली e-KYC वर Click करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. search या बटणावर Click करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा. यानंतर Get Mobile OTP बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला चार अंकी OTP टाकावा, Submit OTP चे बटण दाबावे. त्यानंतर Get Aadhar OTP या बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला सहा अंकी OTP Aadhar Registered mobile OTP या रकान्यात टाकावा. त्यानंतर Submit हे बटण दाबावे. हिरव्या रंगात e-KYC यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा संदेश आपणास मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.अशाप्रकारे ई-केवायसी अपुर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी ही प्रक्रीया पुर्ण करावी. ही केवायसी पुर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना माहे ऑगस्ट 2022 नंतरचे अनुदान हप्ते मिळणार नाही. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MAL BHAIRATI BASAVARAJ INAUGURATES NAVYA ABHARANA
MAL BHAIRATI BASAVARAJ INAUGURATES NAVYA ABHARANA
कृषि श्रमिक सम्बल मिशन योजना के तहत बांड में भूमिहीन महिलाओं को दिया प्रशिक्षण
रिपोर्ट - महेंद्र जांगिड़
गुड़ामालानी।राजस्थान कृषि श्रमिक सम्बल मिशन योजना के तहत पंचायत...
ಬೆಂಗಳೂರಿನ ಗಾಂಧಿ ಭವನದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವಕರಾದ ಆನಂದ್ ಅವರಿಗೆ "ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ರತ್ನ" ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಮಾಡಲಾಯಿತು.
September 20, 2024
ಬೆಂಗಳೂರಿನ ಗಾಂಧಿ ಭವನದಲ್ಲಿ 'ಶ್ರೀ ಡಿ. ದೇವರಾಜ ಅರಸು ಜಯಂತೋತ್ಸವ ನಡೆಯಿತು....
ગ્રાન્ટ પ્રીમિયર ગુજરાતી ફિલ્મ નટવર ઉર્ફે 𝙉𝙏𝙍
💠 ગઈકાલે પીવીઆર ખાતે એક જોરદાર ગુજરાતી ફિલ્મ નટવર ઉર્ફે 𝙉𝙏𝙍 નો જોરદાર ગ્રાન્ટ પ્રીમિયર શો...
ડીસામાં મામલતદાર કચેરી કમ્પાઉન્ડમાં મોડી સાંજે સાપ દેખાતા અફડા તફડીનો માહોલ સર્જાયો હતો. #enews
ડીસામાં મામલતદાર કચેરી કમ્પાઉન્ડમાં મોડી સાંજે સાપ દેખાતા અફડા તફડીનો માહોલ સર્જાયો હતો. #enews