यवतमाळ : पंधरा लाखाच्या खंडणीची मागणी करीत चार ते पाच जणांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना पांढरकवडा येथील मुलीच्या वसतिगृहाजवळ घडली.
यश चमेडीया (वय 23), असे जखमी तरुणाचे नाव आहे. यश चमेडीया याला मुलींच्या वसतिगृहाजवळ संशयीत लाला खान आणि चार ते पाच जणांनी घेरले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून गळा आवळत लोखंडी रॉडने यशच्या डोक्यावर जोरदार वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्या पाच जणांनी यशच्या खिशातून 85 हजार, दुचाकीमधून एक लाख, मोबाईल हिसकावून नेला. यशला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, याप्रकरणात पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवयन पाच जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला.