कर्ज बाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

"पैठण तालुक्यातिल मर्दा गेवराई येथील घटना"

पाचोड(विजय चिडे) कर्ज बाजारी पणा कंटाळून पैठण तालुक्यातिल मर्दा गेवराई येथील एका३८ वर्षीय व्यक्तीने सोमवारी राहत्या घरी (दि.२२) रोजी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस घडली असून नाना भिमराव सूर्यनारायण असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,मर्दा गेवराई येथील शेतकरी नाना भिमराव सूर्यनारायण (वय३८ वर्ष) यांना स्वतःच्या मालकीची काही शेती असून ते स्वतःच्या शेती सह इतर ठिकाणी मोलमजुरी करत असल्याची चर्चा गावकऱ्यांना असुन त्यांच्यावर तीन ते चार लाखांचे फायनान्सचे कर्ज असल्याचे चर्चा असून याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली दुपारी तीनच्या सुमारास घरी कोणीही नसताना ते विषारी औषध पिऊन घरामध्येच झोपले असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही.दुपारीच्या वेळेस घरातील सदस्य आल्याने त्यांनी सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून केले. वैद्यकीय अधिकारी त्यांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला असुन या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण सह पोलिस नाईक रविद्र आंबेकर करीत आहेत.