वाशिम जिल्ह्यात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.1 जून 2022 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 690.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

         आज 22 ऑगस्ट रोजी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका - 0.2 मिमी,( 703.4), रिसोड तालुका - 0.4 मिमी (663.9), मालेगाव तालुका - 0.3 मिमी (754.8), मंगरूळपीर तालुका - निरंक (740.2), मानोरा तालुका - 0.4 (778.3) आणि कारंजा तालुका - 1.6 (529.6) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 22 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 674.5 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.