सेनगाव सद्या सेनगाव तालुक्यातील सोयाबीनचा हंगाम सुरु होत आहे परंतु शासनाने सोयाबीनचे भाव कमी केले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेबानी शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या मालाला कमीत कमी 6 हजार भाव द्यावा.
सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक काढणीला सुरुवात केली आहे तर शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे घरी येण्या अगोदरच शासनाने सोयाबीनचे दर कमी केलेले आहेत. सेनगाव तालुक्यातील शेतकरी कधी अतिवृष्टी तर कधी बोगस बियाणे अशा विविध समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच आता शासनाने शेतकऱ्यांची सोयाबीन घरी येण्यास सुरुवात होतात सोयाबीनचे दर कमी केलेले आहेत. हे कमी केलेले सोयाबीनचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या मालाला कमीत कमी सहा हजार रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष वैशाली वाघ यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे मागणी केली आहे.