रावेर (प्रतिनिधी) दि. २२. रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक सावदा शहर कार्यकारणी बांधणी संदर्भात दि.२१ . दुपारी ४. वाजता रविवार रोजी सावदा येथील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आयु. विनोद भाऊ सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हा महासचिव आयु. दिनेश भाऊ ईखारे यांच्या उपस्थितीत रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिनेश भाऊ इखारे यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे ध्येय धोरण श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर हे सर्व धर्मियांसाठी मुस्लिम, तडवी, बौद्ध, संपूर्ण ओबीसी समाजासाठी रात्रंदिवस काम करीत आहे. व ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम बाळासाहेब करीत आहे असे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे म्हणाले की गेल्या २५ ते ३० वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती, महापालिका या ठिकाणी एक हाती सत्ता घेतली आहे. आणि हे कशामुळे घडले तर तिथला ओबीसी समाज्याला सत्तेमध्ये बसून मान सन्मान दिला. म्हणून अकोल्यामध्ये एक हाती सत्ता घेऊन प्रास्ताविकांना हादरा दिला. असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे म्हणाले की सावदा शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे.आणि हे काम आपण सर्वांना करायचे आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुद्धा इतर पक्षांना हे दाखवून द्यायचे आहे. की आता महाराष्ट्रातला तिसरा पर्याय हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील या महाराष्ट्रामध्ये इथल्या संपूर्ण वंचित समाजाला सत्तेमध्ये बसवणार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर पूर्ण करणार आहे. असे ते अध्यक्ष भाषणामध्ये म्हणाले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक शेख याकुब शेख नसीर, दीपक तायडे, शेख इमरान, कंदर सिंग बारेला, गौतम अटकाळे, राजेंद्र अवसरमल, सुरेश अटकाळे, अरविंद गाढे, नसीर खान, मोहसीन, सय्यद अजहर, दौलत अडांगळे, रिजवान खान, वसीम खान, शेख वाईद, सलीम खान, विकास बारेला, सय्यद युनुस. या बैठकीला बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.