*बारामती येथे युथ फेस्टिव्हलचा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
*माजी मंत्री आ.धनंजय मुंडेच्या हस्ते दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटन*
*परळी कृ.उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकभाऊ फड व आकर्षण सिने अभिनेत्री राधिका पाटिल यांची विशेष उपस्थिती*
*दहीहंडी विजेत्या संघाचा वंजारवाडी युथ फेस्टिवल च्या वतीने आ.धनंजय मुंडे चषक व रोख बक्षीसांचे वितरण*
बारामती (प्रतिनिधी) :- बारामती येथे युथ फेस्टिवल चा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.२०/८/२०२२ रोजी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव या उत्सवाचे आयोजन पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार बारामती यांच्या माध्यमातून करण्यात आले. या दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यभरात दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून बारामती येथील नागरिकांना दहीहंडी महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडी महोत्सवासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिक भाऊ फड यांच्या सह, बारामती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राहुल वाबले जितू काटे दादा जराड धनंजय मुंडे साहेब युवा प्रतिष्ठान सोलापूर चे पै सनी देवकते व धारूर येथील युवा नेते प्रदीप नेहरकर ,आक्षय टेळे ,विकी पवार ,विकास जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये अनेक मान्यवर व बारामती मधील पदाधिकारी उपस्थित होते. बारामती शहरातील विद्यानगरी एम आय डी सी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी जनसागर उसळला होता. दहीहंडी मध्ये विविध संघ उपस्थित झाले होते त्यापैकी जय भवानी दहीहंडी संघ गुणवडी यांनी दहीहंडी फोडून प्रथम बक्षीस मिळवण्याचा मान मिळवला.दहीहंडी विजेत्या संघाला वंजारवाडी युथ फेस्टिवल च्या वतीने आयोजक जितेंद्र भाऊ वीरकर व सागर भाऊ दराडे , नितीन भैया चौधर यांनी आ. धनंजय भाऊ मुंडे चषक व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान चौकामधील दहीहंडी पथकांचा थरार पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वंजारवाडी युथ फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष पोपट भाऊ दराडे, अध्यक्ष राहुल शिरसट , उपाध्यक्ष सचिन चौधर, खजिनदार समीर चौधर , कार्याध्यक्ष विशाल चौधर तसेच , संयोजन समिती सदस्य आकाश सूर्यवंशी, अजित भोसले, रोहित साळुंके, विजय चौधर, शुभम दराडे, प्रवीण चौधर, तारा देवासी , योगेश दराडे, श्याम चौधर, संजू चौधर आदींनी परिश्रम घेतले.