घराच्या आवारातून कार चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला अटक करण्यात अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिसांना यश मिळाले. प्रथम ऊर्फ गोठ्या रविंद्र इंगोले राहणार . भातकुली पंचायत समितीजवळ, अमरावती असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील कार ही आरोपी प्रथम इंगोलेचा यवतमाळातील मित्राच्या घरून जप्त केली आहे. "5 ऑक्टोबर 2021 रोजी अरुण महादेवराव झाडे राहणार नवजीवन कॉलनी, विद्यापीठ रोड, अमरावती यांनी फ्रेजरुपुरा पोलिस ठाण्यात कार चोरी गेल्याची तक्रार नोंदविली होती.
ते 1 सप्टेंबर 2021 रोजी त्यांची मुलगी सपना हिला भेटण्याकरिता गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे गेले होते. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता झाडे यांचे भाडेकरू गायत्री डहाके यांनी फोन करून सांगितले की, कम्पाउंडच्या आतमध्ये ठेवलेली मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार क्रमांक एमएच 27 एसी 0582 (50 हजार रुपये) ही दिसून येत नाही. ती कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर अरुण झाडे यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याच्या तपासात गुप्त माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी प्रथम उर्फ गोठ्या रविंद्र इंगोले याला