नांदुरा : दि.२२.केंद्र सरकारच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आता निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे अनिवार्य केले आहे. यामुळे बोगस मतदारांना मतदानापासून रोखणार आहेत.बोगस मतदारांचा छडा लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी सरकारने अधिसूचना ही जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने नांदुरा तालुक्यातील ग्राम शेंबा बू याठिकाणी मतदान कार्ड ला आधार कार्ड जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मोठ्या संख्येने मिळत आहे. ही नोंदणी करण्यासाठी शेंबा बू येथील बी. एल. ओ.म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी निलेश दाभाडे, संतोष बोरकर आणि कोतवाल_रामेश्वर बावणे यांची निवड करण्यात आली आहे.त्यानुसार आधार जोडणीचे काम चालू असून
वार्ड क्रमांक १ साठी _ संतोष बोरकर
वार्ड क्रमांक २ साठी_ रामेश्वर बावणे
वार्ड क्रमांक ३ साठी _निलेश दाभाडे
निवडणूक ओळखपत्र आधारशी जोडणे बंधनकारक असे आवाहन करण्यात आले आहे.