आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र व शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी विनायकरावजी मेटे यांच्या अस्तीकलशाचे आष्टी तालुक्यात आगमण झाले व दर्शन घेण्यात आले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चिकाटी सोडली नाही.मेटे साहेबांनी अत्यंत गरीब घरात जन्म घेतला.पेंन्टीग कामापासून ते फळे भाज्या विक्री पर्यंत त्यांनी कामे केली.अशा परिस्थितीत असताना ही त्यांनी शिक्षण सोडले नाही.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
राजकिय जिवनात पदार्पण करत असताना आण्णासाहेब पाटील यांच्या सोबत काम करत त्यांनी आपल्या राजकिय जीवनाला सुरुवात केली.मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की मग अरबी समुद्रात शिवस्मारकचा प्रश्न असो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या व अशा प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला.
या अस्थीकलश यात्रेची सुरुवात खाकाळवाडी पासुन ते शेरी, कडा, देविनिमगांव, डोगरगण, साबलखेड, धानोरा, खुंटेफळ, सोलापूरवाडी, खरडगव्हाण, पिंपळा, सय्यदमीर लोणी,नांदूर, वाघळुज,अंभोरा, हिवरा, सुलेमान देवळा,वेलतूरी, सावरगांव,म्हसोबावाडी फाटा, देवळाली ते पुन्हा दि.२३ रोजी पैठण येथे जाऊन अस्थीवीसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिली आहे.
त्याचबरोबर मेटे साहेबांनंतर त्यांच्या पत्नी डॉ ज्योतीताई मेटे यांना या सरकारने राज्यपाल कोट्यातुन आमदारकी देण्यात यावी व शिवसंग्राम पक्षाला बळ द्यावे अशीही मागणी चौधरी यांनी केली आहे.या अस्थीकलश यात्रेच्या दर्शनाची तयारी शिवसंग्राम आष्टी तालुक्याच्या वतीने करण्यात आली होती.यावेळी राजू म्हस्के, धनंजय फिस्के, बाळासाहेब बोरुडे, मयुर चव्हाण, ज्ञानदेव थोरवे, अशोक चौधरी, छोटू घोडके, सचिन तळेकर,आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते