इंग्लंडसुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत गौरी मंगलसींग सोळंके हीने भारतासाठी कांस्य पदकाची कमाई करून दिली. स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूरची अंतरष्ट्रीय तलवारबाज असलेल्या गौरीने संपूर्ण देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे.कॉमनवेल्थ खेळणारी आणि पदक जिंकणारी गौरी ही बुलढाणा जिल्ह्यातील पहिली खेळाडू आहे. सध्या १२ वी चे शिक्षण घेत असलेली गौरीला बुलढाणा जिल्हा तलवारबाजी संघटणेच्या अधिपत्याखाली स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून क्रीडा पुरस्कार प्राप्त विजय पळसकर यांचे मार्गदर्शन व निखिल गलवाडे यांचे प्रशिक्षण लाभले. या दरम्यान तीने सातत्यपूर्ण सराव व मेहनत घेऊन विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे कसब दाखवत अनेक पदके मिळविली. पुढे तीची खेलो ईंडिया साठी नाडियाद, गुजरात येथे निवड झाली. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळवत तीने औरंगाबाद, महाराष्ट्र येथील साई सेंटरवर तज्ञ मार्गदर्शक तुकाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात कसून सराव केला. आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर तीची ईंग्लड येथे आयोजित फेंसिंग काॅमनवेल्थ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले. या मिळालेल्या संधीचे सोने करत तीने काॅमनवेल्थ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत देशासाठी कांस्य पदक जिंकून दिले.तीच्या या यशाबद्दल बोलतांना "गौरीच्या कर्तबगारीचा आम्हाला अभिमान असुन भविष्यात ती नक्कीच देशासाठी ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवून दाखवेल", असा विश्वास असल्याचे स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूर चे अध्यक्ष प्रा. डाॅ. नितीन भुजबळ यांनी सांगितले. विशेषतः घरी कोणतीच क्रीडा पार्श्वभूमी नसतांना देखिल केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे नावलौकिक आवणार्या गौरीचे आई वडील प्राथमिक शिक्षक आहेत. तीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होत आहे. त्यात बुलढाणा जिल्हा तलवारबाजी संघटणेचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी अनिल ईंगळे आदींसह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.