भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वाशीम ता.अधिवेशन संपन्न.

वाशीम :: वार्ता ::

 दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह वाशीम येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन संपन्न करण्यात आले.या वेळी सर्वानुमते जगदीश मानवतकर यांची सर्वानुमते ता.सचिव पदी नेमणूक करण्यात आली.

                     सविस्तर वृत्त असे की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन वाशीम येथील शासकीय विश्रामगृह वाशीम येथे संपन्न करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन आदरणीय कॉ.संजय मंडवधरे साहेब यांची तर उपस्थिती मध्ये वाशीम येथील भाकपचे युवा नेते प्रो. जगदिश मानवतकर सर , मंग्रुळपिर येथील भाकपचे ज्येष्ठ नेते रमेश मुंजे साहेब , मानोरा येथील मीरा बेलखेडे , वाशीम येथील सुप्रसिद्ध युवा सर्प मित्र मयुरेश मानधने , वाशीम येथील सुप्रसीद्ध वकील ॲड.संतोष केसवानी , सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाठोरे हे उपस्थित होते.या वेळी संजय मांडवधरे यांनी पक्षाची स्थापना तर आतापर्यंतची पक्षाची सुवर्ण वाटचाल कशी झाली ? या पक्षाने कोणते आंदोलने केली ? पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल या विषयी माहिती दिली.तर जगदीश मानवतकर यांनी आपल्याला वाशीम मध्ये कश्या प्रकारे पक्षाची वाटचाल कशी करायची आहे .या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. असेल.या वेळी कॉ.रमेश मुंजे साहेबांनी सुध्दा नवीन सदस्यांना अभ्यासपूर्ण भाषण करून अनमोल असे मार्गदर्शन केले. या वेळी नितेश सावके यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन नितीन बांगर यांनी केले.या वेळी AISF ,AIYF ,AIKS ,शालेय पोषण आहार,AITUC ची कार्यकारणी घोषित करण्यात आली.या कार्यक्रमांत सोनु मणेर , गजानन इंगोले,अक्षय इंगोले,रामदास कालापाड, अरविंद इंगोले, बादल वानखेडे,विकास खडसे,आकाश कांबळे यांनी आपल्या सद्यसाची नोंद केली व परिश्रम घेतले.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वाशीम ता.अधिवेशन संपन्न.