यवतमाळ : अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांना सध्या मदतीची प्रतीक्षा आहे. अशातच राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पिकांची पाहणी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून भरीव मदत देण्यात येईल, नुकसान पाहणीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.