यवतमाळ : जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उपस्थित करून एकाला शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर दगडाने डोक्यावर मारून जखमी केले. तसेच दिले जाण्याची धमकी दिली ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास शाळेजवळ लोकमाता चौक येथे घडली मनोज किशोरराव दामधर (33) राहणार गळव्हा बाबुळगाव असे फिर्यादीचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून आरोपी गौरव गजबे (वय 25) राहणार चांदोरे नगर व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.