फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातील निधीतून 20 लक्ष रुपये खर्च करून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन आज दि 21 रोजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आले

फुलंब्री तालुक्यातील बाबरा गाव हे जिल्हा परिषदेचं गट असून याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जितेंद्र जैस्वाल हे मागील दोन पंचवार्षिक पासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत असून,त्याच्या माध्यमातून तसेच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या निधीतून त्यांनी आपल्या गटामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामे खेचून आणली आहे.

त्याच प्रमाणे गावाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी गावात राजकारण बाजूला सावरत सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करत ग्रामपंचायत निवडणूक लढवली व त्यात ही त्यांना यश मिळालं,त्यानंतर सोसायटीच्या निवडणूक झाल्या त्यात ही त्यांचे सर्व संचालक मंडळ निवडणून आले असून,आशा पद्धतीने गावाच्या विकासासाठी त्यांनी सर्वाना एकत्र घेत विकासाची वाटचाल धरली आहे,आज दि 21 रोजी ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाच्या निधीतून 20 लक्ष रुपये खर्च करून गावातील वार्ड क्रमांक 2 मध्ये ड्रेनेज लाईन,तसेच वार्ड क्रमांक 5 मध्ये ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक बसवणे,जिल्हा परिषद शाळेच्या प्रगणात पेव्हर ब्लॉक बसवणे,अंगणवाडी दुरुस्ती अश्या 20 लक्ष रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आज जिल्हा परिशद सदस्य जितेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.