नांदुरा:दि.२१.मा. भीमराव तायडे साहेब माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा यांनी तक्षशिला नगर नांदुरा येथे सुरु वर्षावास कार्यक्रमाचे अनुषंगाने सुरू असलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनास भेट दिली.त्यावेळी प्रथम श्री. बाळु चापके यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर भीमराव तायडे साहेब यांनीग्रंथ वाचक व विश्लेषक श्री. तुकारामजी रोकडे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. तर दुसरे ग्रंथ वाचक व विश्लेषक छाया ताई बांगर यांचे स्वागत श्री. पी. डी. सरदार यांनी केले. आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळू चापके यांचे स्वागत श्री. इंगळे पोलीस विभाग यांनी केले. त्यानंतर ग्रंथ वाचनास सुरवात झाली. आणि शेवटच्या भागात मा. तायडे साहेब यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी विविध उदाहरणे सांगून विस्तृत मार्गदर्शन केले आणि अंगुली मालाबद्दल व तो भिक्कु कसा झाला हे सांगितले. त्यांनी ग्रंथातील यापूर्वीच्या वाचनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. यावेळी जीवन जाधव, बांगर साहेब रामेशवर रणीत समाधान हेलोडे वाकोडे सर राजेश भिडे, प्रशांत वाकोडे, सुभाष तेलंग, सुनील वाकोडे, अशोक दामोदर, नितीन नाईक, अरविंद वानखडे, शालिग्राम हेलोडे, इंगळे पो. वि., कल्पनाताई वाकोडे, सुनीताताई हेलोडे, तेलंगताई, सुरडकरताई, मीराताई रणित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.