7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा.
अन्यथा तीव्र आंदोलन करू मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व माजी जि.प.अध्यक्ष रविभाऊ ओलालवार यांचा इशारा.
गडचिरोली(अहेरी ):- एटापली तालुक्यातील बहुचर्चित सूरजागड लोहप्रकल्प जनतेच्या विरोध असताना सुद्धा सुरू करण्यात आली असून सूरजागड येथून दररोज लोह दगड वाहतूक केले जात असून दरदिवशी मोठमोठे ट्रक नी लोहदगळ वाहतूक केले जात आहे.त्यामुळे आलापली ते आष्टी महामार्गवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने मोटर सायकल,वाहन चालकाना जीव धोक्यात घालून कमालीच्या त्रास सहन करवा लागत आहे.तसेच बाहेर गावावरून आलापली,आष्टी येते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना शाळेत वेळेवर पोहचता येत नसून जिव मुठीत धरून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागत आहे व एकादी आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यास अडचण निर्माण झाले असून असे कित्येक घटना पहावयास मिळत आहेत.तरी सदर समस्यांवर त्वरीत लक्ष घालून सदर मार्ग दूरुस्थ करण्यात यावी अन्यथा सात (7) दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
अशी निवेदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व बोरीचे सरपंच शंकर कोडापे,राजपुर प्याच सरपंचा वेलादी म्याडम,नितीन गुंडावार, खमनचेरुसरपंच शायलू मडावी,महागाव,लगाम ग्राम पंचायतीचे सरपंच ,सुरेश गंगादरीवार,सोयल पठाण,पांडुरंग रामटेके,रावी नेलकूद्री,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी तसेच सर्व ग्रा.प.सरपंच उपसरपंच सदस्य गण उपस्तीत राहून अहेरीचे तहसीलदार साहेब यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी साहेबाकडे पाठवले आहे..