भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेले आपले माजी सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा दि.२० ऑगष्ट रोजी बुलढाणा स्थित स्थानिक गांधी भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यातील बरेच वर्ष देशासाठी अर्पण केलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करणे व पक्ष प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची असलेली माजी सैनिकांच्या बद्दलची भूमिका स्पष्ट करणे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी आपल्या पक्ष्याची भूमिका मांडली व माजी सैनिकांचा गुणगौरव केला. तसेच तालुका अध्यक्ष संदीप लहाने यांनी सुद्धा आपलं मत मांडलं आणि सन्मानपूर्वक सत्काराला उत्तर देतांना माजी सैनिक अनिल डोंगरदिवे यांनी सांगितले की आम्ही श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रति प्रामाणिक व वंचित बहुजन आघाडी सोबत खंबीरपणे उभे राहू.कार्यक्रमाप्रसंगी सर्व सन्माननीय माजी सैनिकांचा शाल, पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी बुलढाणा शहरात वास्तव्यास असलेले माजी सैनिक विजय राऊत, समाधान मोरे, अनिल डोंगरदिवे, गंगाराम चिंचोले, विठोबा गवई, शंकर हिवाळे, भारत जाधव, विशाल हिवाळे, गुलाब मिसाळ, गजानन भालेराव, प्रकाश मिसाळ, राजू नाटेकर, राजु वानखेडे, राहुल जाधव, गजानन मिसाळ, विजय सुरभे, विनोद डोंगरदिवे, कैलास खिल्लारे, मधुकर खरे, गणेश साळवे, रमेश जाधव, सतीश तायडे, क्रिष्णा देशमुख, रमाकांत सोनोने यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष संदीप लहाने, शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, तालुका पदाधिकारी अरुण सरदार, शहर पदाधिकारी गजानन गवई, विजय सरकटे, सचिन वानखडे, भाऊराव तायडे, राजु वानखेडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गवई यांनी तर आभार प्रदर्शन अरुण सरदार यांनी केले.