जिल्ह्यातील विविध ग्रामशाखेत भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार केंद्र तयार होत आहेत -केंद्रीय शिक्षक नितीन वाघमारे(जिल्हा उपाध्यक्ष)
जालना जिल्ह्यात महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे ग्रामशाखा आणि ग्रामशाखेत बुद्धविहार, संस्कार केंद्र उभारणी च मोठ्या प्रमाणावर काम जालना जिल्ह्यात चालू असल्याचे सांगत खोरवड ग्राम शाखेच्या वतीने बुद्ध विहाराच भूमिपूजन पूजनीय भन्ते शिलरत्न थेरो व जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक नितीन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी बुद्ध विहारच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा संस्कार चे विविध शिबिर लावण्याचं कार्य मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता चोरमारे, तालुकासरचिटनिस महेंद्र टेकुळे, तालुका संस्कार उपाध्यक्ष अशोक रणवीर,संरक्षण उपाध्यक्ष संदीप सदावर्ते, तालुका संघटक गौतम अंभोरे, मिलिंद अंभोरे शहराध्यक्ष अतुल खरात, शहर सरचिटणीस भगवान वाघ, संगीता खाडे ताई आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बुध्द आणि त्याचा धम्म या धम्म ग्रंथाचे समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकासरचिटनिस महेंद्र टेकुळे यांनी तर आभार बौधाचार्य अतुल खरात यांनी केले.