कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

            कोरेगाव भीमा, ता.शिरुर येथील सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब सदाशिव भांडवलकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. दै. लोकमतचे पत्रकार व शिरूर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील भांडवलकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर यांचे ते वडील होत.