एल.के.आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबिएसई स्कूलमध्ये दहीहंडी कार्यक्रम जल्लोषात साजरा
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये राधाकृष्ण वेशभूषा, यशोदानंदन नाटिका , मटकी सजावट स्पर्धा , दहीहंडी कार्यक्रम शाळेच्या क्रीडांगणावर जल्लोषात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, परीक्षक रुचिता गुप्ता, नीता बलदेव, शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमा पूजनाने डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते झाली. राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत क्युरीय स्पीडच्या छोट्या चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. या स्पर्धेत प्रथम अर्णेश नाईकनवरे, द्वितीय रीधन जोगदंड, तृतीय माधवी सोळंके, मटकी सजावट या स्पर्धेत प्रथम प्रियंका झंवर, द्वितीय सुवर्णा नाईकनवरे, यशोदा नंदन नाटिका स्पर्धेत प्रथम प्रियांका करवा, द्वितीय संपदा राजूरकर यांनी क्रमांक पटकावले.
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सपनो मे आये शाम मुरारी, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मला ग बाई या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केले. तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राधे ओ राधे, चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राधे कृष्णा राधे कृष्णा, सातव्या वर्गातील विद्यार्थिनींनी ढोलिडा ढोलीडा व आठवी वर्गातील विद्यार्थी नेहमी गरबा नृत्या सोबत संगीतमय नाटिका सादर केली. तसेच तिसऱ्या वर्गातील विद्यार्थिनींनी घागर घेऊन, पाचवी वर्गातील विद्यार्थी राधा माझी राधा माझी या गीतांचे गायन केले. व प्रेक्षकांची मने जिकंली.
कार्यक्रमाची सांगता दहीहंडी फोडून केली. प्रिन्स स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी व शाळेतील शिक्षकांनी एकूण पाच दहीहंडी संगीतमय वातावरणात व जल्लोषात तीन ते चार थर लावून फोडली.
यावेळी राधे राधे, गोविंदा आला रे आला या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रीना ठाकूर,सूत्रसंचालन मिलिंद खंदारे,विलास जाधव व आभार प्रदर्शन विलास शेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.