भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या २५ दिवसात १००० किमीचा सायकल प्रवास पूर्ण करण्यासाठी एका दिवसात अकोला ते महान व परत असा ७५ किलोमीटरचा सायकलने प्रवास पूर्ण करीत अकोल्यातील जिजाऊ कॉन्व्हेंट आणि जन्मगाव असलेल्या वाडेगाव येथे सायकलींग बाबत मार्गदर्शन केले व अमृतमहोत्सव साजरा केला .
पल्हाडे यांचे मूळ गाव वाडेगाव असून त्यांचे शिक्षण अकोला येथून झाले आहे. नोकरीसोबतच डिप्लोमा चेन्नई येथे पूर्ण केला, तसेच परत पुण्यात नोकरी करत असताना बीटेक पूर्ण केले व सध्या इटालियन इनेल ग्रीन पॉवर कंपनीत बेंगळूर येथे कार्यरत आहेत. कंपनीकडून इटलीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पिसा येथून "एमबीए- रिन्युएबल एनर्जी" मध्ये २०१७ - २०१९ पूर्ण केले. याच काळात "सायकलिंग करीत स्पोर्टी लाईफ स्टाईल) व करिअर" विषयी अनेक ठिकाणी मार्गदर्शन करीत सायकलींगबाबत युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सतत भ्रमण करणे सुरू असल्याने त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यात येणं असल्याने येथील जिजाऊ कन्या विद्यालय व वाडेगाव येथील श्री बालाजी कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अकोला-गोरेगांव-वाडेगाव- बार्शीटाकळी-महान व परत दररोज साधारण दोनशे किलोमीटर तसेच मागील पंचवीस दिवसांत १००० किलोमीटर सायकलींगचे लक्ष्य पूर्ण केले .
कामानिमित्त मेक्सिको अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली नेदरलॅण्ड्स असा सायकल ने प्रवास केला. इटलीमध्ये एका अमेरिकन मित्राची सायकलींग करण्याची मदत मिळाली. इच्छा हीच होती की इतर राज्यात व इतर देशांत सायकलींग केले आहे तर मग त्या सायकलींगचे फायदे गावातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थी यांच्यासमोर शेअर करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ही नामी संधी होती आणि त्याचा फायदा वाडेगाव येथील मूळ रहिवासी आणि आता बेंगलोर येथे कामानिमित्त स्थायीक झालेले पल्हाडे यांनी करून घेतला. बालाजी कॉन्व्हेंट वाडेगाव येथे प्राचार्य दिपक मसने, अध्यक्ष तथा मार्गदर्शक विलास वरोकार तसेच सौ सारिता कातखेडे व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शक लाभले.