राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार अमरावती जिल्हातील धारणी दौऱ्यावर आले आहेत. राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असल्याने त्यांच्या स्वागतासाठी अमरावती जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली . त्यांचे अमरावती शहरातील रहाटगाव टी पॉईंट येथे आगमन होताच अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी सुद्धा विरोधीपक्ष नेता अजित पवार यांचे अमरावती आगमना निमित्य हार्दिक स्वागत केले. रहाटगाव रिंग रोड येथे विरोधीपक्षनेते अजित दादा पवार यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली . तसेच विरोधी पक्षनेता माननीय अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी अमरावतीत विविध भागात पोस्टर्स व बॅनर्स व राष्ट्रवादीचे झेंडे सुद्धा लावण्यात आले. दरम्यान विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार यांनी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला . विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांच्या अमरावती आगमनानिमित्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून एकच दादा-अजितदादा, विकास पूर्तीचा वादा- अजितदादा अशा गगनभेदी घोषणा देतात रहाटगाव रिंग रोड दणाणून गेला होता.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પારપડા ખાતે ગુજરાત ગુરુ બ્રાહ્મણ સમાજનો 12 મો સમુહલગ્ન સમારોહ યોજાયો
પારપડા ખાતે ગુજરાત ગુરુ બ્રાહ્મણ સમાજનો 12 મો સમુહલગ્ન સમારોહ યોજાયો
Business News | Women Traders के शेयर और निवेश से जुड़े सवालों के मिलेंगे जवाब|Saas, Bahu Aur Sensex
Business News | Women Traders के शेयर और निवेश से जुड़े सवालों के मिलेंगे जवाब|Saas, Bahu Aur Sensex
दिसंबर में होगी सचिन पायलट की बड़ी 'परीक्षा'! राजस्थान के सियासी आसमान में उड़ान भरने का मौका
राजस्थान में इस संभवतः इस साल के दिसंबर माह में 7 सीटों पर विधानसभा उपचुनाव हो सकते हैं. इन सात...
ডিমাকুছিত আছা আৰু CDIৰ উদ্যোগত ১৪ অনূৰ্ধ্ব আন্তঃগাওঁ ফুটবল খেল
ডিমাকুছিত আছা আৰু CDIৰ উদ্যোগত ১৪ অনূৰ্ধ্ব আন্তঃগাওঁ ফুটবল খেল
Breaking News: 8 June को PM पद की शपथ ले सकते हैं Narendra Modi | Lok Sabha Election Result 2024
Breaking News: 8 June को PM पद की शपथ ले सकते हैं Narendra Modi | Lok Sabha Election Result 2024