"मुस्लिम समाजाच्या तरूणांनी दिली सलामी"

चौसाळा (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथे गोकुळाष्टमी व दहिहंडी निमित्त विवेक कुचेकर मिञ मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दिवंगत मा.आ.विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्यानंतरच सुरूवात करण्यात आली . या कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बागंर पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून चौसाळा शहराचे सरपंच मधुकर तोडकर, ग्रां,पं,सदस्य अतुल शिंदे,युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप जोगदंड, ग्रां,पं,सदस्य अकबर जहाँगिरदार, पञकार अजमेर मनियार, भाजपचे शहराध्यक्ष विनोद कळासे, सलीम जहाँगिरदार, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शैलेश जोगदंड यांच्यासह असंख्य युवावर्गानी व महिलांनी हजेरी लावली होती. यावेळी ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा शिवराज बागंर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विवेक कुचेकर यांनी उभारलेली दहिहंडी ही सामाजिक समतेची असुन प्रत्येक जातीधर्माला सोबत घेऊन चालणारा युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे .अशा युवा नेत्याच्या पाठिंशी खंबीर पणे उभा राहणार असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप चव्हाण, मिलिंद सोनवणे, प्रदीप ईगोंले, पवन कुचेकर, आमोल जावळे, शाहेद, पठाण, आयमद शेख,अजय ईगोंले, राहुल वाघमारे, शंकर सोनवणे, विकी ढोकणे,आदेश बोबडे,प्रमेश्वर निर्मळ, कृष्णा चव्हाण, महेंद्र सोनवणे, प्रकाश ढोकणे,गणेश साठे,गणेश काळे,निवांत वाघमारे, सागर काळे,सुरेश मानगिरे, आर्जुन काळे,राजेश ढोकणे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी उपस्थित जनसमुदायाचे विवेक (बाबा)कुचेकर यांनी आभार मानले.