शेवगाव (प्रतिनिधी) मौजे शेवगांव येथे संतोषी माता मंदिरात प्रा किसन चव्हाणसर यांची घोंगडी बैठक संपन्न झाली ,या प्रसंगी शेवगांव शहरातील सामाजिक युवकांनी व महीलांनी वंचित बहूजन आघाड़ीचे समाज कार्याला प्रभावित होवून प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला या प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उर्फ पप्पूशेठ गर्जे,विवेक दळवी,हितेश आहुजा,सौ नुरजहा सादिक बेग यांनी जाहीर प्रवेश केला या घोगंडी बैठकीत प्रा किसन चव्हाणसर विजय हुसळेसर,नितीन आढाव, शेख राजूभाई,यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली वंचित बहूजन आघाडी मध्ये सर्व समाजाती तरुण युवक, महीला भगीणींचा मोठासमुह प्रवेश करून आम्ही स्वाभिमानी आहोत याचा परिचय देत आहे आता सर्व सामान्य कुंटुबाला व नागरीकाच्यां समस्या सोडवणे करिता वंचित बहूजन आघाडी सक्षम आहे असे प्रा किसन चव्हाणसर म्हणाले या बैठकीत शास्रीनगर भागातील महीला भगीणी व रोडरोमियोंचना त्रासलेल्या रहीवाश्यांनी आपल्या प्रभागातील,रस्ते,गटार,दुर्गंधीयुक्त पाणी,१५ दिवसला पाणी येणे अशा अनेक जटील समस्यांचा पाढाच वाचला या बाबत वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई म्हणाले की या भागात, टोळक्याने फिरणार्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यात येईल या बाबत शेवगांव पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे या बैठकिस शास्री नगर भागातील ज्ञानेश्वर रिसे,महेश कोळेकर, सादिक बेग,सत्तार पठाण,रामहरी शेजूळ,सतीश ससाणे,अजय देशमुख,सागर गायकवाड,दिंडे नितीन, अशोक बिडे, विशाल ईंगळे, योगेश हवाले, सुभाष तुजारे,तसेच सुरक्षित महीला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्र संचालन लक्ष्मण मोरे यांनी केले तर सर्व उपस्थितीतांचे आभार सागर हवाले यांनी केले