आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा व डोंगरगाव या गावांमध्ये वनविभागाची जमीन असून त्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण करून संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यांशी हात मिळवणी करून तसेच आर्थिक व्यवहार करून जमिनीवर अतिक्रमण धारकांच्या नावे केल्याने त्यांची चौकशी करून संबंधित जमिनी हडप केलेल्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून सदरील जमीन पुन्हा वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
याविषयी अधिक माहिती अशी की,कडा व डोंगरगण येथे अंदाजे दहा हेक्टर कडा या गावात वन विभागाची जमीन असून ती हडप केली व डोंगरगण येथे दहा ते सतरा हेक्टर एवढी जमीनीचे क्षेत्र वनविभागाचे असून सदरील क्षेत्रावर काही भूमाफियांनी अनाधिकृतपणे वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रम केले असून त्या शेतजमीन मालकांनी वनविभागाचे जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर संगणमताने आर्थिक व्यवहार करण्यात आला असून बनावट कागदपत्रे तयार करून तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांनी खोटे दस्तावेज तयार करून वन विभागाशी अतिक्रमण धारकांना सातबारा व आठ अ त्यांच्या नावावर निंयमबाह्य तयार करून नोंद करण्यात आली आहे.
वन विभागाची जमीन हडप करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी ची सखोल चौकशी करून तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून वन विभागाची जमीन अतिक्रमण झालेली असून ती वन विभागाची जमीन पुन्हा वन विभागाकडे हस्तंतरित करून द्यावी नसता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.