डोड्रा ते देऊळगावमही या रोडचे डांबरी करनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत शलाका कंट्रक्शनला दिले होते.सदर काम हे अंदाज पत्रकानुसार झालेले नसून अतिशय निकृष्ट दर्जाजे झालेले आहे, अशा बाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उद्धव वाकोडे यांनी दि.३/१/२०२२ रोजी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीला आठ महिने उलटूनही संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.त्यामुळे त्यांनी पुन्हा निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा निवेदनतून दिला आहे.

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सिमेंट रोड व डांबरीकरणाचे काम शलाका कंट्रक्शन ला दिले होते परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून मुदतीच्या आत रस्ता खराब झाला आहे. शासनाच्या अटी शर्ती प्रमाणे शासनाच्या अंदाजपत्रकानुसार काम होणे गरजेचे असताना थातूरमातूर पद्धतीचे काम केले आहे.गावातील शाळेजवळ मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. सांडपाण्याची विल्हेवाट न लावता रोडवर सोडून देण्यात आले आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस आहेत. सासलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून जनतेचेआरोग्य धोक्यात आहे. याला सर्वस्वी जबाबदार असलेले कॉन्टॅक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे होते. तशा प्रकारची तक्रारही शासनाकडे व संबंधित विभागाकडे २५/२/२०२२ ला असताना कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा कार्यालय समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.