शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्ताने महादेव भगत हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एन एन ८८१८ या दुचाकीहून चाललेला असताना समोरून आलेल्या एम एच १४ डी एम ०७९६ या टेम्पोची महादेवला जोरदार धडक असून अपघात झाला, अपघातात महादेवला जोरात मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक राकेश मळेकर, अंबादास थोरे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करत महादेव भगतचा मृतदेह शवविच्छेदन साठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला, सदर घटनेमध्ये महादेव परमेश्वर भगत वय ३७ वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे मूळ फरा. आडमापूर ता. चिखली जि. बुलढाणा याचा मृत्यू झाला असून याबाबत सुरज सुरेशराव अडसळू वय ३७ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पोचालक शिदोबा साहेबराव दगडे वय ४८ वर्षे रा. इंद्रायणीनगर भोसरी पुणे मूळ रा. दौंडज ता. पुरंदर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.