लोकसेवा संकुल फुलगाव , पुणे येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाआरंभानिमित्त आसाम येथे कार्यरत असणारे तरुण , तडफदार आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात प्रार्थनेने केली. प्रार्थना आपल्याला जीवनामध्ये यशाच्या शिखरावर घेऊन जाते. याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. देशसेवा करत असताना स्वतः वर झालेल्या गोळीबाराची माहिती देऊन देशभक्तीचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच स्वप्ने उराशी बाळगली पाहिजेत. आजची विद्यार्थ्यांची मानसिकता ही वेगळ्या वळणावर जात आहे. ही मानसिकता योग्य वळणावर ठेवून यश कसे गाठावे. यावर त्यांनी प्रकाश टाकला. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमा नंतर वैभवजीना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली व त्यांच्याशी संवाद साधला निंबाळकर यांच्या समवेत त्यांचे वडील  चंद्रकांत निंबाळकर व आई सौ. निंबाळकर,जीवन विद्या मिशनच्या सौ. स्वाती संधांशी तसेच संस्थेचे हितचिंतक रवींद्र गुरव हे आवर्जून उपस्थित होते. लोकसेवा संस्थेचे संचालक प्रा. नरहरी पाटील, सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर मुलींच्या शाळेच्या प्राचार्य लक्ष्मी कुलकर्णी तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसं चालन रेश्मा मांढरे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन विकास तिरकुंडे,भारत पवार,तुषार वाघमारे यांनी केले.