औरंगाबाद :- (दीपक परेराव)१९ ऑगस्ट पवित्र श्रावण मास निमित्त मागील ५ वर्षापासून शहरात विश्वविक्रमी नामांकन प्राप्त कावड यात्रेचे त्याच भक्ती भावाने आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ८:०० वाजता कावड यात्रा काढण्यात येणार असून उल्कानगरी येथील ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या पवित्र जलकुंडातून जल कलश भरून खडकेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात येणार आहे.

 ओंकारेश्वर महादेव मंदिर उल्कानगरी येथून पवित्र जल कलश भरून चेतक घोडा - हॉटेल सायली चौक - तानाजी चौक - बालाजी नगर - मोंढा नाका - लक्ष्मण चावडी - महर्षी वाल्मिकी चौक - रविवार बाजार रोड - मोती कारंजा - अंगूरी बाग - दिवाण देवडी - गुलमंडी - संभाजी पेठ - नागेश्वरवाडी मार्गे खडकेश्वर महादेव मंदिरात पोहोचेल. या यात्रेत हिंदू बांधवांनी विराट संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कावड यात्रा संयोजन समितीचे संयोजक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले आहे.

या विश्वविक्रमी कावड यात्रेची जागतिक विक्रमांची नोंद घेणारी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळालेले आहे. या कावड यात्रेच्या पूर्व तयारीसाठी संयोजन समिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, प्रभाकर मते, ह.भ.प नवनाथ महाराज आंधळे, पंडित विजय कुमार पल्लोड, विनोद शेवतेकर, रमेशचंद्र दरख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून समस्त सर्व हिंदू संघटना, सर्व सांप्रदायिक अध्यात्मिक संघटना, सर्व सामाजिक संघटना, सहभागी होणार आहे. या यात्रेच्या प्रचारासाठी शहरात ठिकठिकाणी विविध संप्रदायाच्या धार्मिक संघटनेच्या बैठका घेण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणावर महिला माता-भगिनी सुद्धा कलश घेऊन या यात्रेत सहभागी होणार आहे. शहरातील तब्बल ५८ महादेव मंदिरात प्रचार करण्यात येत आहे, या यात्रेत ठिकठिकाणी कावड घेऊन चालणाऱ्या शिवभक्तांचे पूजन करण्यात येणार असून त्याचवेळी ठिकठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे, ही एक ऐतिहासिक कावड यात्रा असून या यात्रेत समस्त संभाजीनगरातील हिंदू बांधव, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभागृह नेता विकास जैन, शहरप्रमुख विजय वाघचौरे बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटक प्राजक्ता राजपूत ,अशा दातार, विद्या अग्निहोत्री विधानसभा संघटक नलिनी महाजन, लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे विविध हिंदू धार्मिक संघटनेचे पदाधिकारी जोगेंद्रसिंह चौहान, शिवाजी इंजे पाटील, संजय गाडेकर, शेषराव चव्हाण, सौ.निर्मला संजय खंडागळे,ललित पाटणी, डॉ. जितेंद्र पहाडे, विनोद लोहाडे, शिवाजी बोरुळे, शिवप्रसाद तोतला, शरद चावडा, रणजितसिंग गुलाटी, प्रमोद झाल्टे, हरबिंदसिंग बिंद्रा, जगदेवसिंग गुरुदत्ता, पुरुषोत्तम दरख, सचिन वाडे पाटील, स्वप्निल बाहेती, प्रफुल मालानी, मनीष जयस्वाल, नरेंद्रसिंग जाबिंदा, सतीश लड्डा, सोमनाथ आप्पा साखरे, ज्ञानेश्वर आप्पा खरडे, विनोद बगाडिया, राजू पवार, विलासराव देशमुख, प्रीतम गोसावी, अनंत जहागीरदार, कन्हैयालाल डेबरा, नानकसेठ परसवाणी, प्रभंजन महतोले यांनी केले आहे.