फुलंब्री शहरालगत असलेल्या वाघ वस्ती वरील 16 वर्षीय तरुण बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला असताना त्याच बुडून मृत्यु झाला आहे,या दुर्देवी घटनेमुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
फुलंब्री तालुक्यात सध्या पावसामुळे नद्या नाले ओढे हे भरून वाहताना दिसून येत आहे,पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुर्देवी घटना देखील घडल्या आहेत,मागील काही दिवसांपूर्वी शिरोडी येथील युवकांचा वीज पडून मृत्यु झाला होता, त्याच प्रमाणे बाजारसावगी येथील पुराच्या पाण्यात वाहून एका युवकाचा मृत्यू झाला,हे होत असतानाच त्यात काल दि 18 रोजी फुलंब्री शहरा जवळील वाघ वस्ती वर राहणाऱ्या 16 वर्षीय युवक विशाल भगवान वाघ हा आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गट नंबर 499 मधील खदाणीत दहा वाजेच्या सुमारास गेला असताना, त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व त्यातच तो बुडून मयत झाला,त्या सोबत असलेल्या मित्राने आरडाओरडा केला त्यावेळी जवळच असलेल्या त्याचा नातेवाईकांनी त्यास घेऊन ग्रामीण रुग्णालय गाठले मात्र,डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.यानंतर डॉक्टरांनी पोलीस स्टेशन मध्ये mlc पाठवली मात्र काही चूक झाल्याने,पुन्हा नातेवाईकांनी जाऊन ती दुरुस्त केली व 1:30 वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.शोकाकुल वातावरणात विशाल च्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले