बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्री क्षेत्र कोंडेश्वर येथील तलावाजवळ युवक - युवतीस कुऱ्हाडीचा धाक दाखवून लूटणाऱ्या चार जणांना बडनेरा पोलीसांनी अटक केली . योगेश मुरलीधर ऊईक रोशन अरूणराव टेकाम मनोज रमेश फुरसंगे व देवराव बिनाजी | स्वर्गे सर्व राहणार . ग्राम गोविंदपुर तालुका . जिल्हा . अमरावती ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . मिळालेल्या माहीतीनुसार टिमटाला गावातील एक १९ वर्षीय युवक हा त्याच्या मैत्रीणीसोबत कारने श्री क्षेत्र कोंडेश्वर येथील तलावाजवळ पिझ्झा खात हातो . दुपारी पावणे तीन वाजताचे सुमारास एक व्यक्ती कुऱ्हाड घेवून तिथे आला . यावेळी आणखी तिघे तिथे आले होते . त्यांनी युवकाचे पाकीट हिसकले . पाकीटामध्ये २१०० रूपयाची रोकड होती . याप्रकरणी बडनेरा पोलीसांनी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ३९२, ५०६ ( ब ) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता . याप्रकरणात पोलीसांनी योगेश ऊईक , रोशन टेकाम , मनोज फुरसंगे व देवराव स्वर्गे यांना अटक करून त्यांच्याजवळून मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ . आरती सिंह , उपायुक्त मकानदार , सहाय्यक आयुक्त ढोले , बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाबाराव अवचार साहेब , क्राईम निरीक्षक विजय दिघे , रायलीवाले यांनी केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
66 धर्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त
जिंतूर- 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास...
મોરબી ઝૂલતા પુલનો 30 સેકન્ડનો વિડીયો સામે આવ્યો જેમાં 15 મી સેકન્ડે સર્જાયો મો*નું તાંડવ...
મોરબી ઝૂલતા પુલનો 30 સેકન્ડનો વિડીયો સામે આવ્યો જેમાં 15 મી સેકન્ડે સર્જાયો મો*નું તાંડવ...
অসমত পুনৰ অনুস্থিত হ'ব নেশ্যনেল গেমছ
অসমত পুনৰ অনুস্থিত হ'ব নেশ্যনেল গেমছ২০২৫ অথবা ২০২৬ চনত অসমত অনুষ্ঠিত হ'ব ৰাষ্ট্ৰীয় ক্ৰীড়া...
অঙ্কীয়া ভাওনা সমাৰোহ ২২-২৩ ৰ আজি কাৰ্যালয় উদ্বোধন কৰা হয় বনগাঁৱ চাৰি আলিত।
অঙ্কীয়া ভাওনা সমাৰোহ ২২-২৩ ৰ আজি কাৰ্যালয় উদ্বোধন কৰা হয় বনগাঁৱ চাৰি আলিত।
MCN NEWS| बेलगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीतील अतिक्रमणे अखेर हटवली
MCN NEWS| बेलगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीतील अतिक्रमणे अखेर हटवली