जगदंबा स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहांत साजरी

चिमुकल्यानी तीन थर लावून फोडली दहीहंडी

पाचोड प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूल मधे शुक्रवारी चिमुकल्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी फोडून साजरी केली.या दहीहंडी कार्यक्रमासाठी विद्यार्थी खास श्रीकृष्ण व बालगोपाळांच्या पोशाखात आले होते तर विद्यार्थिनींनी खास राधेपोशाख परिधान केला होता.दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी तीन थर असले.

 या प्रसंगी या विद्यार्थ्यांच्या या खेळाचे विहामांडवा व परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत याप्रसंगी विहामांडवा केंद्राचे केंद्रप्रमुख रायभान गायकवाड शाळेचे सचिव प्रशांत नरके यांच्यासह मुख्याध्यापिका मयुरी खोबरे,संतोष रखे,कल्याणी कुलकर्णी,रामेश्वर काकडे,अक्षय गाभूड,स्वाती नरके,मनीषा सोनटक्के,ऐश्वर्या जाधव,वैष्णवी देशमाने,रूपाली गायकवाड, भाग्यश्री हकम,राजेंद्र वाकडे,सुशील थोरे,अमोल आव्हाड यांची उपस्थिती होती.