नातेपुते नगरीचं रांगडं युवा नेतृत्व मामासाहेब पांढरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार मोठ्या उत्साहात संपन्न
नातेपुते नगरीचं रांगड युवा नेतृत्व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज चे उपसभापती मा श्री मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शोभा वाढवावी ही नम्र विनंती आयोजक व संयोजक यांच्याकडून करण्यात आलेली आहेवाढदिवसानिमित्त घेण्यात येणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक 19/8/ 2022 या दिवशी मामासाहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते इतिहासकार मा श्री नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान 5 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजीराव मधोजीराव तथा बाबाराजे देशमुख असनार आहेत.
स्थळ डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपुते दिनांक 22/8/2022 रोजी भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजरत्न राजेंद्र भाऊ पाटील व कार्यक्रमाचे ठिकाण एस एन डी इंटरनॅशनल स्कूल नातेपुते वेळ सकाळी दहा वाजता.तसेच दिनांक 23/8/2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराच कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ (आण्णा) कवितके तसेच कार्यक्रमाचे ठिकाण अतुल उद्योग समूह नातेपुते या ठिकाणी होणार आहे. माळशिरस पॅटर्न परिवाराच्या वतीने नातेपुते गावचं रांगडं युवा नेतृत्व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.