शिवसेना फुलंब्री तालुका अध्यक्ष राजेंद्र ठोबंरे यांचा शिवसेना पदाचा राजीनामा देत सोबत औरंगाबाद शिवसेना जिल्हा प्रमुख,कृषी उत्त्पन्न बाजार समिती,शिवसेना उपतालुका प्रमुख फुलंब्री सभापती चंद्रकांत जाधव शिंदे गटात जाहीर प्रवेश
औरंगाबाद :- (दीपक परेराव) १९ ऑगस्ट औरंगाबाद शिवसेना फुलंब्री तालुका प्रमुख ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोबंरे यांचा शिवसेना पदाचा राजीनामा देत सोबत औरंगाबाद शिवसेना जिल्हा प्रमुख ग्रामीण नरेंद्र त्रिवेदी ,कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती जाधव यांनी आज ४ वाजता मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना राजीनामा पत्र सादर केले. यापत्रात त्यांनी म्हंटले आहे की, मी कोणाच्याही दबावाखाली किंवा म्हणण्यानुसार मी राजीनामा देत नसून स्वतः राजीखुशीने राजीनामा देत आहे.
माझा शिवसेना प्रमुख या पदाचा राजीनामा स्वीकारून मंजूर करण्यात यावा. मी १९८७ शिवसेना शाखाप्रमुख सन १९८८ विभाग प्रमुख होतो.सन २०००ते २०२२ तालुकाप्रमुख या पदावर कार्यरत होतो. सन २००७ ते २०१० या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अध्यक्ष जिल्हा परिषद संभाजीनगर या पदावर काम केले.
या माध्यमातून तळागाळातील शिवसैनिकाचे त्यांचे योग्य प्रकारे काम करून घेतले शिवसेनेमध्ये सन १९८७ पासून ते आजपर्यंत इमानदारीने आणि पक्षाचे काम केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले परंतु सध्याच्या घडामोडी राजकारण लक्षात घेता मला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.
आतापर्यंत माननीय शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मला मानसन्मान प्रतिष्ठा हे सर्व काही मिळाले असून यापुढे माननीय शिवसेनाप्रमुख व त्यांचे कुटुंब मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी यांच्या बद्दल मला सार्थ आदर व कायम राहील बद्दल मी कधीही ठाकरे परिवार, शिवसेना, मातोश्रीच्या विरुद्ध अपशब्द वापरणार नाही मी सदैव शिवसेनेचा व सर्व मान्यवरांचा कायम आभारी राहील असे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबई जाऊन दिले.