माय - लेकाला विहिरीत ढकलले ...

पैठण तालक्यातील हिरडपुरी येथील तरुणाने पुण्यात पत्नीचा मुलासह केला खून ;आरोपीला पोलिसांच्या बेड्या

पुणे-

-शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ८ शेअर पुणे जिल्हयातील अण्णापूर ( ता . शिरूर ) गावात 8 ऑगस्ट रोजी विहिरीत सापडलेल्या एक महिला व अल्पवयीन मुलाच्या खुनाचा शिरूर पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे . चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा व मुलाचा विहिरीत ढकलून खून केल्याची बाब समजली शिरूर पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे . चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा व मुलाचा विहिरीत ढकलून खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे . 

*संशयित पैठणचा*मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी योगेश संभाजी कुऱ्हाडे ( वय -22 , रा . हिरडपुरी , ता . पैठण , औरंगाबाद ) या आरोपीला अटक केली आहे . त्याने पत्नी रूपाली योगेश कुऱ्हाडे ( वय -22 ) तसेच साडेचार महिन्याचा मुलगा कार्तिक योगेश कुऱ्हाडे यांचा खून केला आहे . पोलिसांना सुरुवातीला अनोखळी महिला व मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात कुंडलिक तुकाराम येरवले यांनी तक्रारद दिल्याने पोलिसांनी अक्समात मृताचा गुन्हा नोंद केला होता . पोलिसांनी दोन मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले असता त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले 

*पत्नी बीडची*

 याबाबत मयत रुपाली कुऱ्हाडे हिचे वडील बंडू खवले ( वय - 40 , रा . गुळज , ता.गेवराई , बीड ) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात आरोपी योगेश कुऱ्हाडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली . त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे . न्यायालयात आरोपीस हजर केले असता त्यास तीन दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे . अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली आहे .