गणेशोत्सव शांतेत साजरा करा-उपवागीय अधिकारी डॉ.विशाल नेहूल
पाचोड प्रतिनिधी/ सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाला येत्या काही दिवसांत सुरुवात होत आहे.तरी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरीता गणेश उत्सवानिमित्त पाचोड पोलिस ठाण्यांच्यावतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये बोलताना उपवागीय अधिकारी डॉ.विशाल नेहूल असे म्हणाले की,गणेशोत्सवावरही मोठ्या प्रमाणात नियम व निर्बंध असल्याकारणाने दोन वर्षानंतर या वर्षी हा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा होणार असून मूर्ती बाबत तसेच संख्येबाबत कुठलेही बंधन नसल्याने यावर्षी गणरायाचे आगमन हे सर्व नागरिकांना आनंद व सुखमय प्रसन्न करणारे असणार आहे. त्यामुळे या आनंदाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.
तसेच यावेळी सपोनी गणेश सुरवसे यांनी असे म्हणाले की,गणेशही बुद्धीची देवता असून या गणेशाच्या उत्सवाचे पावित्र्य व निर्माल्य राखले गेले पाहिजे गणेश उत्सवात जुगार- दारू अशी वातावरण भ्रष्ट गोष्टी करू नयेत उत्सवाला गालबोट राहणार नाही असे कोणीही वागू नये व गणपतीच्या कार्यकाळामध्ये समाज प्रबोधन कार्यक्रम एकांकिका असे इतर कार्यक्रम असावे गणपती समोर हा जुगार अड्डा होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल,सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे,पाचोडचे उपसरपंच शिवाजी भालसिंगे, सामाजिक कार्यकर्ते धनराज भुमरे, पत्रकार दत्तात्रय भुमरे,अंनिस कुरेशी, भागवत भुमरे, इरफान शेख पो.का.संदीप पाटेकर,पो.का.पवन चव्हाण,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते