औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे
ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांन विरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. जिल्हयातील गुन्हेगारी कारवाई करणारा सलग तिसरा आरोपी हा एम.पी.डी.ए. ऍ़क्ट खाली हर्सुल कारागृहत स्थानबध्द करण्यात आला आहे.
यापुर्वी पोलीस ठाणे पाचोड हद्यीतील सराईत गुन्हेगार अमोल जगन्नाथ चिडे वय 27 वर्षे रा. मुरमा ता. पैठण जि. औरंगाबाद आणि पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्यीतील सनव येथील कुख्यात वाळु माफिया मुजीब अब्दुल शेख वय 34 वर्षे रा. सनव ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांना एक वर्षेसाठी स्थानबध्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.
याचप्रमाणे पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण हद्यीतील ईसम नामे रामदास विठ्ठल वाघ वय 33 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद यांचे विरूध्द पोलीस ठाणे सिल्लोड येथे खालील भादंवी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
1) भादंवी कलम 85(1) महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम अन्वये (02 )गुन्हे,
2) भादंवी कलम 354,(अ)(1) 353,509,506,504,34 3) भादंवी कलम 354,(अ),354,504,506
4) भादंवी कलम 324,294,504,506,427 5) भादंवी कलम 324,323,504,506
अशा प्रकारे शरिराविरूध्दचे गुन्हे करित असतांना बेकायदेशिर कृत्ये करून धाकदपटशा करण्याचा सवईचा असुन दारू पिण्यासाठी लोकांना धमकावुन पैसे मागतो नाही दिले तर मारहाण करतो यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले आहे.
त्याचे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍ़क्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.
त्यामुळे मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचेसुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांचे कडे सादर करण्यात आला होता.
यावरून मा.श्री. सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी दिनांक 17/8/2022 रोजी रामदास विठ्ठल वाघ वय 33 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड याचे विरूध्द *एम.पी.डी.ए अधिनियम 1981 सुधारित 2015 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला.
त्यावरुन त्यास काल दिनांक 17/08/2022 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, मा.डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजयकुमार मराठे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड, स्था.गु.शा. चे रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक, सिताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक, विकास आडे, पो.उप.नि. सिल्लोड ग्रा, पोलीस अंमलदार विठ्ठल राख, सचिन सोनार, राजु काकडे, रोकडे, राठोड, ढाकणे यांनी केली आहे.