शिवछत्रपती महाविद्यालयात सामूहिक राष्ट्रगान 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड;-

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वराज्य सप्ताहात शिवछत्रपती महाविद्यालयात (दि.१७) रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक गान झाले. सामूहिक राष्ट्रगान नंतर थोर स्वातंत्र्यसैनिक यांच्या कार्यांवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी प्रकाश टाकला. ज्या थोर महान स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना सर्वप्रथम अभिवादन केले. त्यांनी जे आपले बलिदान दिले त्यांच्या त्या महान कार्य वर प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. 

स्वातंत्र्यदिनांनी बलिदान दिल्यामुळेच आपल्याला आपल्या देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आज आपणास स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण संपूर्ण सप्ताह हा आजादीक अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य सेनानींमुळेच आपण स्वातंत्र्याची गोड फळे चाखत आहोत. आणि स्वतंत्र्याचा आनंद घेत आहोत. म्हणून आपण देखील हे स्वातंत्र्य आबादीत ठेवण्यासाठी व अजूनही आपला देश प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपला देखील त्यामध्ये खारीचा वाटा असला पाहिजे असे सरांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहाने आवाहन केले व त्याचसोबत विद्यार्थ्यांनाही तेवढ्याच उत्साहाने उत्साह दिला व नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.