रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून गरजू लाभार्थी वंचित,खऱ्या गरजूंना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता बार्शीटाकळी पंचायत समितीच्या घरकुल कार्यालया विरोधात आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले,बार्शीटाकळी पंचायत समितीच्या घरकुल विभागात मनमानी कारभार सुरू आहे,या भोंगळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो,पैसे खाऊ अधिकारी वर्गापासून सर्वसाधारण जनता त्रस्त झाली आहे,जनतेला हातावर तुरी देऊन,लाभार्थ्यांचा हक्क हिसकवण्याच्या प्रयत्न या ठिकाणी चालू आहे,याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.
मार्च 2022 पासून रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या तसेच इतर योजनेच्या घरकुल मंजूर असलेल्या गरजू लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता आतापर्यंत वाटप का करण्यात आला नाही.?.याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्वरित पहिला हप्ता देण्यात यावा कर्मचाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने मार्च 2000 पासून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला त्यापैकी किती लाभार्थ्यांनी घरकुले बांधकाम केले याची मोका चौकशी करून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांवर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी .आदी मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले, असून हे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले,लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करण्यात यावं नाही तर याच्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन सम्राट अशोक सेनेच्या वतीने छेडण्यात येणार आहे,असा इशारा यावळी प्रशासनाला देण्यात आला.