बीड (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथे विवेक कुचेकर मिञ मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय दहिहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीचे मार्गदर्शक विवेक(बाबा)कुचेकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.शिवराज बागंर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाट नेते डॉ बाबु जोगदंड साहेब यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेश तांगडे साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सय्याजी (बप्पा )शिंदे ,चौसाळा शहराचे सरपंच मधुकर तोडकर यांची उपस्थिती राहणार आहेत .चौसाळा शहरातील राजर्षी शाहू नगर मोंढा रोड चौसाळा या भागात राज्यस्तरीय दहिहंडीचा कार्यक्रम दि.१९ रोजी विवेक कुचेकर मिञ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे .तसेच दि.१९ रोजी भोजन ठेवण्यात आले असुन तसेच लाईट पोचे आयोजनही करण्यात आले आहे तरी चौसाळा शहरातील हया भव्य दिव्य आगळया वेगळ्या राज्यस्तरीय दहिहंडी कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विवेक कुचेकर, प्रदीप चव्हाण , मिलिंद सोनवणे, प्रदीप ईगोंले, पवन कुचेकर, आमोल जावळे,शाहिद पठाण, आयमद शेख,अजय ईगोंले, राहुल वाघमारे, शंकर सोनवणे, विकी ढोकणे,आदेश बोबडे,प्रमेश्वर निर्मळ, कृष्णा चव्हाण, यांनी केले आहे.