*जागतिक महिला दीन*
दिनांक - 07/03/2026
गाव - खरज .
तालुका - वैजापूर
आज अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अनुलोम मार्फत 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमला एकूण 35 महिलांची उपस्थिती होती तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर
94036 38165
सर्वश्री.महेश सोळंके सर
94043 63630,
जनार्धन जाधव सर
95957 76566
यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीमती. राधा कुंदे अनुलोम संवादिनी म्हणून ओळख करून दिली. तसेच अनुलोम समाजामध्ये कसे काम करते याची माहिती सांगितली.
शाळेतील मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा मांडला.
उपस्थित सर्व महिलांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोळंके सरांनी आभार व्यक्त केले.
नंतर शाळेच्या वतीने उपस्थित महिलांना अल्पोपहार देण्यात आला .
अशा प्रकारे कार्यक्रम छान रित्या पार पडला.