कन्नड दि 8 आज महिला दिनाचे औचित्य साधून अनुलोम सखी मंच तर्फे कन्नड शहरातील महिलांसाठी मातृशक्तीचा जागर अंतर्गत महिला प्रबोधन कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती सीमा धवालिया या उपस्थित होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती संध्याताई उपासने व अध्यक्षस्थानी अनुलोम संवादिनी श्रीमती पायल ढोले या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुलोम सखी श्रीमती अनुराधा मांडे व अनुलोम संवादिनी श्रीमती शुभ्रा सोनगिरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या वक्त्या श्रीमती धवालिया मॅडम यांनी आजच्या महिला व मुलींनी घ्यावयाची काळजी या विषयावर सखोल प्रकाश पाडला. आजच्या युगामध्ये महिलांसमोर असणाऱ्या अडचणी आणि युवतींनी काय करावे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या श्रीमती संध्याताई उपासने यांनी सुद्धा स्त्री जीवनाचा आधार काय असावा व आजच्या स्त्रियांनी व युवतींनी नेमकं कोणत्या गोष्टी पाळाव्यात यावर मार्गदर्शन केले. अनुलोम संस्थेतर्फे श्रीमती पायल ढोले यांनी अनुलोम संदर्भात चालू असलेले सामाजिक कार्यक्रम याविषयी माहिती दिली. मातृशक्तीचा सन्मान म्हणून कार्यक्रमास उपस्थित सर्व स्त्रियांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अनुलोम संस्थे तर्फे स्त्रियांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्त्रियांना येणाऱ्या शासकीय ,सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक मधल्या अडचणी याविषयी अनुलोम संवादिनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.अनुलोम सखी यांनी आलेल्या सर्व सन्माननीय पाहुणे व मातृशक्ती यांचे आभार मानले.