जामदया ते लिंगदरी पांदण रस्ता मोकळा करून द्या, तहसीलदार यांच्या कडे शेतकऱ्याच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील जामदया ते लिंगदरी पूर्वीपासून असलेला पांदण रस्ता हा एका शेतकऱ्याने नदी मार्गाने काढून दिल्याने शेतकऱ्याला पाण्यातून मार्ग शोधावा लागत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता पंधरा दिवसाच्या आत मोकळा करण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर जामदया येथील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यायेईल असा इशारा देखील आज दिनांक 26 सप्टेंबर वार सोमवारी रोजी निवेदनाद्वारे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे या निवेदनावर शेतकरी भुजंग शेळके यशवंत लाटे देविदास जाधव अशोक लाटे विलास गायकवाड यासह३२ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यासह निवेदन देण्यात आले आहे
 
  
  
  
  
   
   
  