जि.प.शाळा लांडेवस्ती ता.शिरुर,जि.पुणे

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवास उत्साह व जल्लोषात सुरुवात झाली. दि.13 ते 15 आॅगस्ट 2022 या कालावधीत दररोज ध्वजारोहन सुरु झाले. या शाळेचे नेहमी प्रमाणे नवीन उपक्रम असतात.आजचा उपक्रम हर घर ध्वज यासाठी पालकांनी सहभाग घेतला.तसेच प्रत्येक विद्यार्थी ध्वज या उपक्रमात राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक रंगभरण करण्याचा आनंद विद्यार्थी मित्रांनी घेतला.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सर्व वस्तीतील नागरिकांसाठी आनंदाचा सण आहे. दि.13 आॅगस्ट 2022 रोजी ध्वजारोहणासाठी मान.केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे  ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ आढाव,तसेच सदस्य,विद्यार्थी उपस्थित होते.दि.14 आॅगस्ट रोजी 75 वर्षे वय असणा-या ग्रामस्थांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

माता पालकासाठी रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले . स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पूर्वतयारी पालकांचा उस्फूर्त सहभाग मिळाला. दि.15 आॅगस्ट 2022 रोजी शाळेत लांडेवस्तीतील तळेगाव ढमढेरे चे ग्रामपंचायत सदस्य सौ.स्वातीताई बाळासाहेब लांडे,सोल्जर  दत्तात्रय धायरकर ,माजी सदस्य मोहनराव भुजबळ,माजी उपसरपंच सौ.उज्वलाताई भुजबळ,सौ.कांचनताई भुजबळ,सर्व माजी सदस्य,ग्रामस्थ ,उद्योजक सचिन लांडे, भुजबळ, शा.व्य.स.अध्यक्ष दशरथ आढाव,सचिन आढाव,उमेश आढाव ,सौ.अनिता भुजबळ,सौ.शितल भुजबळ,सौ.शितलताई दशरथ आढाव व शालेय विद्यार्थीनी यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या प्रत्येकांचे गुलाब पुुष्प व श्रीफळ देऊन शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला.तरुण मंडळांचाही सहभाग उस्फूर्त होता.शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची 75 यासंख्येमध्ये आकर्षक बैठकरचना करण्यात आली.शालेय परिसर स्वच्छता,सजावट करण्यात पालकांनी सहभाग घेतला .मुख्याध्यापिका रेशमा म.शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहशिक्षिका सौ.विजया गो.लोंढे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी कार्यक्रमाची पूर्तता व शिस्त पालनासाठी सहकार्य केले.ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि शालेय कामकाजाचे कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.बालचमुंना व उपस्थातांना खाऊ वाटप करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ रामभाऊ आढाव यांनी शालापोयगी वस्तू शाळेस दिल्या.उपस्थित मान्यवरांन तर्फे मुलांना पेन,पेन्सिल,खाऊ चे वाटप करण्यात आले.बाळासाहेब लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.