।। गणेश महासंघ २०२५२६ कार्यकारणी जाहीर अनिकेत निलावार यांची अध्यक्ष म्हणून निवड।।
*पत्रकार परिषदेत उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत नील्लावार यांची माहिती*
*छत्रपती संभाजीनगर | दि.२२ :* दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून “नशामुक्त” छत्रपती संभाजीनगर हा संकल्प घेऊन सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, अनिल बोरसे, डॉ.बाळासाहेब थोरात, राजेंद्र दाते पाटील, डी. एन. पाटील, महेश उबाळे, रामभाऊ पेरकर, गणू पांडे, गोकुळ मलके, हरीश शिंदे, शिवाजी कवडे, विक्की जाधव, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना अनिकेत निल्लावार म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मोठ्या थाटात आणि जल्लोषात करण्यात आले. स्वाभिमान संस्कृतीचा....अभिमान उत्सवाचा... हे ब्रीद घेऊन श्री गणेश महासंघ यंदा १०१ वे वर्ष साजरे करत आहे. यामध्ये गणेश भक्तांच्या सहभागाने श्री गणेशोत्सवाची सुरुवात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी होणार आहे. यावेळी अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी महासंघाची नूतन कार्यकारिणीही घोषित केली.
असे आहेत कार्यक्रम :
बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अजबनगर येथील श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात “श्री” ची प्रतिष्ठापना होईल. तर दुपारी १२ ते ७ वाजेदरम्यान पर्यावरणाच्या संवर्धनार्थ जिल्हा परिषदेच्या मैदानावर “एक झाड, एक मंडळ अभियानास सुरुवात होईल. गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी समर्थ नगर येथील वरद गणेश मंदिरात सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान श्री गणेश भक्तांच्या सहभागाने “अथर्वशीर्ष महापठण” होईल. शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानी देण्यात येईल. शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून प्रोझोन मॉल च्या प्रांगणात पारंपारिक व संस्कृती जोपासणारी भव्य
ढोल-ताशा वादन स्पर्धा होईल. रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात महानगर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी वर्गासाठी “विशेष आरोग्य चिकित्सा” शिबीर होईल. सोमवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकास अभिवादन करून “महापुरुषांच्या स्मारकांच्या स्वच्छता मोहीम” राबविण्यात येईल. मंगळवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी शहरातील विविध शाळांमध्ये “नशामुक्त छत्रपती संभाजी नगर” या मोहिमेस प्रत्यक्षरित्या प्रारंभ होईल. बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून जिल्हा परिषदेच्या मैदानावर अस्सल मराठी मातीतील मैदानी खेळ “कुस्ती स्पर्धा” सुरु होतील. तर गुरुवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी अजबनगर येथील श्री गणेश महासंघाच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून “भव्य रक्तदान” शिबिरास रक्तदात्यांच्या सहभागाने सुरुवात होईल. तर शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजाबाजार येथील शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिरापासून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शहरातील लोकप्रतिनिधी तसेच गणेशभक्तांच्या सहभागाने प्रारंभ होईल.
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आयोजित विविध समाजाभिमुख उपक्रम तसेच कार्यक्रमास शहरातील सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, किशोर शितोळे, तनसुख झांबड, शिरीष बोराळकर, विजय औताडे, राजीव जहागीरदार,अनिल मकरिये, पंकज फुलफगर,डी.एन.पाटील, राजु शिंदे, राजेंद्र दानवे, नंदकुमार घोडेले, कृष्णा बनकर, नागराज गायकवाड, अनिकेत पवार सचिन पवार, हरीश शिंदे, हर्षवर्धन कराड, विश्वनाथ राजपूत, राज वानखेडे, विशाल दाभाडे, अनिल बोरसे, संजय (सन्नी) बारवाल, शिवाजी दांडगे, सुमित खांबेकर, बाळासाहेब औताडे, राम पेरकर,आनंद तांदुळवाडीकर, सतिश कटकटे, प्रशांत जोशी, विक्की जाधव, बबन नरवडे,
राजेश मेहता, अॅड. निनाद खोचे, स्वरूप जाधव, अशोक शहा, रुपेश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले आहे.
जिल्हा श्री गणेश महासंघ, उत्सव समिती-२०२५
छत्रपती संभाजीनगर.