बीड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड शहरातील सुभाष रोडवरील आदर्श मार्केट व्यापारी संघटनेच्यावतीने सर्व सभासदांनी सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीत गावून भारताची एकता व अखंडतेचे दर्शन घडविले.
राज्य शासनाने दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खाजगी आस्थापना, व्यापार्यांनी राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आदेश दिले होते. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला आदर्श मार्केट व्यापारी संघटनेने देखील प्रतिसाद दिले. आज सकाळी 11 वाजता सुभाष रोडवरील सर्व व्यापार्यांनी एकत्र येत राष्ट्रगीताचे गायन केले. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर, सचिव सुदाम चव्हाण, उपाध्यक्ष महेबुब शेख, कोषाध्यक्ष सुभाषराव उगले, गणेश मुळे, ओंकार उपरे, रवि वानखेडे, महादेव औताडे, लक्ष्मण गायकवाड, अरूण देवधरे, मच्छिंद्र उपरे, समशाद पटेल, हमीद चाऊस, शेख इलियास, शेख साबेर, शेख आरेफ, मुन्ना मोमीन, मज्जीद मोमीन, दत्ता भांबे, सोमेश कानगांवकर, अक्षय कानगांवकर, बाळू कानगांवकर, लाला कानगांवकर, भारत राऊत, राजु लांडे, अशोक पतंगे, किरण वाघमारे, दिपक पतंगे, शुभम पाखरे, रोशन कानगांवकर, औताडे आप्पा, रवी उगले, शिवाजी शिंदे, खेडकर, मुळे, उज्ज्वल गायकवाड, गोविंद खेडकर, गजानन मानकुस, हेंद्रे आप्पा, मंगेश मुळे, शुभम पाखरे, रियाजभाई, विशाल मानकुस, मंगेश मानकूस, गणेश राऊत, अक्षय आवारे, सिध्देश्वर किवने, राहुल शिंदे, निलेश पतंगे, गणेश मानकूस, सुग्रीव चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, शिंदे, नाना वाघमारे, राजेश फुटाणे, योगेश कानाडे, देवीदास नेरे, ताटे, देवीदास मसुरे, सर्व सभासद पदाधिकारी, गाळेधारक या उपक्रमात सहभागी झाले होते.