75 वा आझादी का अमृतमहोत्सव यानिमित्त डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालय पाथ्री, फुलंब्री, औरंगाबाद येथे १४ ऑगस्ट 2022 रोजी सेंद्रीय शेती परिसवांद हा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडाळाचे उपाअध्यक्ष, मा. श्री राजेंद्र भाऊ पाथ्रीकर यांनी केले. हवामानातील बदल व दुष्पपरिणाम टाळण्यासाठी, विषमुक्त माती करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, देशी गावरान बियाणे, देशी गौवंश संगोपन, घरघुती खते व औषधे निर्मीती कशी करावी. व तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन जैविक पद्धतीने कसे करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन प्रमुख वक्ते मा.श्री. राहुल बारवकर सर व डॉ.भरत सोनलने सर.यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती परिसंवाद या कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागरगोजे सर यांनीही शेतकर्यांना सेंद्रीय शेती बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मुराई अतुल,प्रा. आडे सुनिल, प्रा. घुले वसंत व धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर संभाजीनगर, रविकांत बाबर, माणिकराव डिडोरे,गवंडर संजयआप्पा,प्रविण डिडोरे, अब्दुल सत्तार,गजानन भापकर, निलेश गायकवाड, प्रकाश खंबाट, व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. वाहेकर गजानन यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. आडे सुनिल यांनी केले.