औरंगाबाद ( आप्पासाहेब गोरे) औरंगाबाद शहरालगत वसलेल्या सातारा परिसराचा विकास झपाट्याने होत असून चांगल्या बाजार पेठा तयार होत आहेत मात्र काही विघ्न संतोषी मंडळी या चांगल्या परिसरात बार सारखे धंदे चालू करून याला विद्रुप स्वरूप आणण्याचं प्रयन्त करत आहेत आगोदरच बायपासला दोन वाईन शॉप आणि चार बियरबार आहेत त्यामुळे रोडवर नेहमीच मद्यधुंद तळीरामचा झिंगाट चालेला असतो त्यातच आता या आमदार रोडवर आणखी एका बिअर बार ला व वाईन शॉपला परवानगी दिली आहे त्यामुळे आता परिसारतील महिलांची आणि नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे हा रस्ता विद्यार्थी आणि महिलांनी सतत गजबजलेला असतो तसेच या मुख्य रस्त्यावरच सातारा पोलीस स्टेशन आहे एवढे सर्व असताना देखील या परिसारत येतांनीच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात मांसाहार खाद्याचे दुकाने थाटल्यामुळे दारू आणि मास जवळच मिळत असल्यामुळे तळीरामचे फावले असून या रस्त्यावर नेहमीच तळीरामचा थयथयाट सकाळ संध्याकाळ पहायला मिळत आहे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि पोलीस आयुक्तांनी आणि सम्बधीत कार्यालयांनी त्वरित लक्ष घालून सदरील दुकानाचा दारू परवाना रद्द करून सर्व उद्योगांना आळा घालवा अशी मागणी dr स्मिता अवचार सविता कुलकर्णी विमल देशपांडे माजी सरपंच फेरोज पटेल अशा सपकाळ शकुंतला पवार, सुनीता सासवाडे ,मंजू सांगळे, सुरेखा आगळे अर्चना शर्मा जोती चिलघर, माजी सरपंच यशवंत राव कदम माजी सरपंच राजुकाका नरवडे राष्ट्रवादीचे राहुल शिंदे सोमिनाथ शिराणे शिवसेनेचे रमेश बाहुले संतोष सपकाळ प्रशांत सातपुते आकाश कांबळे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला आणि नागरिकांनी केली आहे