" ना पूछो जमानेसे की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है की हम हिंदुस्तानी है" आजादी गौरव पदयात्रा आज रिसोड विधानसभेचे आमदार तथा काँग्रेस जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित झनक यांचे नेतृत्वात मौजे ढोरखेडा ते शिरपूर आणि रीठद ते चिखलि भर पावसामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळी, युवावर्ग ,युवक काँग्रेस कमीटीचे नेतृत्व अशा असंख्य संख्येने संबंधित रॅलीमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदविला.
सकाळी दहा वाजता पासून रॅलीला सुरुवात होऊन ढोरखेडा ते शिरपूर तथा रिठद ते चिखली रिसोड येथे समारोप करण्यात आला. विद्यमान आमदार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेवर जिल्हाभरात आजादी गुणगौरव यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या सूचनेनुसार राज्यभरात सध्या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ऑगस्ट नऊ पासून क्रांती दिन चे औचित्य साधून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि बघता बघता वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील प्रत्येक खेडे पिजून काढण्याचं धैर्य आणि समीकरण हे जुळवण्याचे काम आमदार झनक हे करत आहेत .यावेळी सोबत काँग्रेस कमिटीचे अनेक मातब्बर नेते यांची उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस,कमिटीचे युवक काँग्रेसचे,सर्व पदाधिकारी पक्षश्रेष्ठीतील वरिष्ठ मंडळी,तथा तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीचे सदस्यांच्या उपस्थितीत रॅलीचा समारोप करण्यात आला.